Saturday, December 18, 2021

'दादागिरी' आणि विराट ची नामुष्की

     सारख्या महत्त्वाकांक्षेच्या दोन व्यक्ती सोबत आल्या की वाद हे होतातच. ते राजकारण असु द्या किंवा क्रिकेट. हल्ली रोहित आणि विराट च्या बाबतीत अगदी हेच सुरु आहे. दोघेही अव्वल आणि दिग्गज क्रिकेट पटू. कोहलीचा दोन वर्षांपासूनचा खालावलेला फॉर्म आणि एकही आयसीसी टूर्नामेंट न जिंकता आल्यामुळे बीसीसीआय ने त्याला टी २० आणि वन डे कर्णधार पदावरून पायउतार होण्यास सांगितले. याविरुद्ध रोहित चा फॉर्म आणि त्यानी जिंकलेल्या ५ आयपीएल ट्रॉफीज! हे तर साहाजिक आहे आणि क्रिकेट फॅन्स ला पटण्याजोगे आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असणे ही मोठी संधी आहे आणि विराट नी ती उत्कृष्ट रित्या पार पडली असा म्हणायला काही हरकत नाही. हल्ली त्यानी वर्कलोड आणि वैयक्तिक कारणे देत सुट्याही घेतल्या. आगामी २०२३ च्या वर्ल्ड कप ला लक्ष करून रोहित शर्मा सारख्या सक्षम खेळाडूला कर्णधार बनवले. कर्णधार पद ही तर देशाची सेवा करण्यासाठी मिळालेली संधीच आणि ती काही आजीवन नसणार. विराट एक बॅट्समन म्हणूनही सुद्धा उत्कृष्ट  कामगिरी करू शकतो. सचिन तेंडुलकर नी सुद्धा विविध कर्णधारांच्या अंडर मॅचेस खेळून विक्रमांचा डोंगर चढलाच. रोहितला पण एक दिवस कर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागेल हे पण सत्यच.

    याआधी युवराज-धोनी च्या जोडी चे उदाहरण घ्या.  दोघेही मोठे मॅच विंनिंग प्लेयर्स. युवराज सिंग धोनीच्या नेतृत्वात खेळला आणि दोघांनीही मोठ्या पार्टनरशिप्स रचत भारताला टि२०, वन डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीज जिंकून दिल्यात. मतभेत दूर ठेवून, मन मोठे करून दोघेही कर्तृत्व सिद्ध करू शकले. 

    म्हणून रोहित आणि विराट नी पण खेळाचा, देशाचा मान ठेवत आता क्रिकेट खेळायला हवं. विराट नी त्याचं ऍग्रेशन बाजूला सारून खेळ भावनेनी क्रिकेट खेळलं तर भारतीय क्रिकेट पुन्हा विश्वचषक आणू शकते.आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात मॅच च्या आधी भारताचे राष्टगीत होताच दोघेही सर्व मतभेद विसरून देशासाठी मॅच जिंकण्यासाठीच प्रयत्नशील असतील यात काहीच शंका नाही! वादानंतर आता रोहितने सुद्धा विराट बद्दल त्याचे मत व्यक्त करतांना म्हटलेच की विराटची देह बोली सदैव मॅच जिंकण्याचा प्रयत्न दर्शवते आणि टीम ला त्याची आवश्यकता सुद्धा आहे. आणि विराटने पण रोहितशी काही खदखद नसल्याचे मान्य केले व तो टीम इंडिया शी खेळीमेळीने राहतांना दिसला. आता भारतीय संघात सर्व काही आलबेल आहे असंच म्हणूया. 

~तेजल गुर्जर 




No comments:

Post a Comment