Wednesday, September 15, 2021

आधुनिक शुभेच्छा

 पुर्वी सणा-सुधीला मित्र नातेवाईक पोस्टाने ग्रिटींग कार्ड्स पाठवयाचे. कालांतराने, लँडलाईन वरुन एकमेकांना फोन करायचे. नंतर मोबाइल फोन्स आलेत व एसएमएस पाठवायला सुरुवात झाली. एक वेळ अशी आली की एसएमएस च ट्रॅफिक इतक वाढलं की सरकारला एसएमएस ची प्रतिदिवस मर्यादा ठरवावी लागली. काही वर्षां अगोदर बहुतांश सर्वांजवळ स्मार्टफोन्स आलेत आणि व्हाट्सअँप पण आलं आणि मेसेज पाठवण्याची मर्यादा संपली. हल्ली व्हॉट'सअप्प मेसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा आल्यात त्यामुळे बहुतांश लोक व्हाट्सअँप स्टेटस ठेवतात. म्हणजे हे असं झालं की अगदी स्वरूची भोज सारखंच! स्वयंपाक तयार आहे आणि सर्व्ह यौरसेल्फ! असो, येणाऱ्या काळाबद्दल भाकीत न केलेलं बरं! याला धकाधकीचं जीवन म्हणावं की नुस्ता आळशीपणा..

😊😊😊😃😃

No comments:

Post a Comment